नरेंद्र सावईकर यांना कोरोना

0
306

राज्याचे अनिवासी भारतीय व्यवहार आयुक्त व दक्षिण गोव्याचे माजी खासदार व भाजपचे राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांना कोरोनाचा संसर्ग झालेला असून उपचारासाठी त्यांना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात भरती करण्यात आले आहे. आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून आपली प्रकृती ठीक असल्याचे सावईकर म्हणाले.

जे जे कोणी गेल्या चार दिवसांत आपल्या संपर्कात आले होते त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासाठीची चाचणी करून घ्यावी, अशी सूचना सावईकर यांनी एका ट्वीटद्वारे केली आहे.

क्लाफासियो डायस, चर्चिल आलेमाव, श्रीपाद नाईक, सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर, किरण कांदोळकर आदी नेत्यांनंतर कोरोनाचा संसर्ग झालेले नरेंद्र सावईकर हे नवे राजकीय नेते होत.