नरकासुर मिरवणुकीदरम्यानच्या कर्णकर्कश संगीताची मानवाधिकार आयोगाकडून दखल

0
1

सांतइनेज-पणजी येथील कामत आर्केड इमारतीजवळ 30 ऑक्टोबरला रात्रीच्या वेळी आयोजित नरकासुर कार्यक्रमात वाजविण्यात येणाऱ्या संगीताचा आवाज मर्यादित ठेवण्याचा आदेश गोवा मानवाधिकार आयोगाने काल दिला असून, कायदेशीररीत्या परवानगी दिलेल्या वेळेत आणि आवाजाच्या मर्यादेत संगीत वाजवले जाईल, याची खात्री करण्याचा निर्देश स्थानिक पोलिसांनी दिला आहे.

सांतइनेज पणजी येथील कामत आर्केड इमारतीजवळ नरकासुर कार्यक्रमावेळी मोठ्या आवाजातील संगीतामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार गोवा मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या तक्रारीची दखल घेत नरकासुर मिरवणुकीवेळी संगीताचा आवाज मर्यादित ठेवण्याचा निर्देश जारी केला.

आयोगाने कामत आर्केडपासून अंदाजे 20 मीटर अंतरावर साऊंड सिस्टीम रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक पदपथावर ठेवण्याचा आदेश दिला आहे. ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचे पालन आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नियमित तपासणी करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. पोलिसांना 12 नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.