नरकासुराऐवजी दिवाळीत कृष्ण उत्सव साजरा व्हावा

0
185

पणजी
अन्यायावर न्यायाचा विजय दृश्य रूपात प्रतिकात्मकरित्या सादर होणे आवश्यक आहे. या विजयाचा उत्सव म्हणजे दिवाळी! पण नरक चतुर्दशीला होणार्‍या स्पर्धांमधून अन्यायाच्या प्रतिकाला महत्त्व दिले जाते, पण न्यायाची बाजू गौण ठरते. त्यासाठी म्हार्दोळ, फोंडा येथील ‘कृतार्थ’ संस्थेने एक अभिनव उपक्रम समोर आणला असून दिवाळीदिवशी कृष्ण उत्सव साजरा केल्यास खर्‍या अर्थाने आपली संस्कृती पुढे येणार असून त्यातून नातेसंबंध दृढ होणार असल्याचे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
यासंबंधी पणजी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण आणि त्याचा जीवनपट, त्याचे गुणदर्शन आणि त्यातून पुढे येणारी जीवनमूल्ये यांचे उदात्तीकरण, प्रदर्शन, प्रस्तुतीकरण यांना महत्त्व आल्यास दिवाळीचे वातावरण मंगल, प्रसन्न होऊ शकते, असे ते म्हणाले. दीपोत्सवाच्या या नवीन विचारात संस्थेने खालील प्रमाणे उपक्रम सुचविले आहेत.