नदी परिवहन खात्याच्या कर्मचार्‍यांचा संप मागे

0
7

नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्तक्षेपानंतर नदी परिवहन खात्याच्या कर्मचार्‍यांनी नियोजित १२ जानेवारी रोजी पुकारलेला संप काल मागे घेतला. नदी परिवहन खात्याच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी १२ जानेवारीला संपाची नोटीस दिली होती.

त्यानंतर नदी परिवहन खात्याने कर्मचार्‍यांना एस्मा लागू करून संपात सहभागी होण्यास बंदी घातली होती. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. तसेच कर्मचार्‍यांचा जादा कामाचा थकलेला पगार एका वर्षात देण्याचे आश्‍वासन फळदेसाई यांनी दिले. त्यानंतर कर्मचार्‍यांनी हा संप मागे घेतला.