नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा उपचारासाठी अमेरिकेला रवाना

0
246

उपचारासाठी मुंबईला गेलेले नगरविकास खात्याचे मंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी काल दुपारी पुढील उपचारासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते अमेरिकेकडे रवाना झाले. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी व मुलगा असून ते उपचारासाठी महिनाभर अमेरिकेत राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्यांनी त्यासंबंधी कळवले आहे.

फ्रान्सिस डिसोझा यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील लीलावती इस्पितळात उपचार घेतले होते. आजारी असल्याने गोवा विधानसभेच्या मागील दोन अधिवेशनाना त्यांना हजर राहता आले नव्हते. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हेही आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती इस्पितळात उपचार चालू आहेत.