नगरविकासनंत्री डिसोझा लीलावती इस्पितळात दाखल

0
223

नगरविकास मंत्री फ्रांसिस डिसोझा यांची प्रकृती बिघडल्याने काल त्यांना उपचारासाठी मुंबईस्थित लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. डिसोझा यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना काल तातडीने मुंबईला लीलावती इस्पितळात हलवण्यात आले. त्यांना ट्यूमरचा त्रास असल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थामुळे फ्रांसिस डिसोझा चालू विधानसभा अधिवेशनाला एकही दिवस हजेरी लावू शकलेले नाहीत.