नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी नगरनियोजन खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला. राणे यांनी नगरनियोजन खात्याच्या कारभारात आमुलाग्र बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली टीसीपीच्या संचालक मंडळाने अनेक नवीन निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची योग्य रितीने कार्यवाही करण्यासाठी टीसीपी आणि पीडीएच्या ११ वरिष्ठ अधिकार्यांच्या बदलीचा आदेश दिला आहे.