ध्वनिक्षेपक वापरण्यास विशिष्ट दिवशी परवानगी

0
6

पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने 2025 या वर्षामध्ये विशिष्ट दिवशी रात्री 10 ते 12 या वेळेत लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक भाषण प्रणालीचा वापर करण्यास परवानगी देणारा आदेश जारी केला आहे.

ज्या सांस्कृतिक, धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी आणि तारखांना परवानगी देण्यात आली आहे त्यामध्ये कार्निव्हलचा शेवटचा दिवस, 20 एप्रिल 2025 रोजी ईस्टरचा अगोदरचा दिवस, 28 आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी मूर्ती विसर्जनाचा दुसरा आणि पाचवा दिवस, 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी, 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस, 19 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या अगोदरचा दिवस, 21 आणि 22 नोव्हेंबर 2025 रोजी इफ्फी, 24 डिसेंबर 2025 रोजी नाताळचा अगोदरचा दिवस, 25 डिसेंबर 2025 रोजी नाताळ आणि 28 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान नवीन वर्षाची अगोदरचा दिवस यांचा समावेश आहे.