धेंपोची कळंगुट असोसिएशनवर मात

0
75

>> गोवा प्रो-लीग

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने कळंगुट असोसिएशनवर २-० असा देखणा विजय मिळवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण गुणांची कमाई केली. धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात धेंपोला महत्त्वपूर्ण ३ गुण मिळवून देताना कपिल होबळे आणि बीवन डिमेलो यांनी गोल नोंदवित विजयात मोलाचा वाटा उचलाला. या विजयामुळे धेंपोचे १५ सामन्यांतून ३४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी आहेत. तर पराभूत कळंगुट असोसिएशन संघ तेवढ्याच सामन्यांतून १८ गुणांसह पाचव्या स्थानी कायम राहिला.