थातोडी-धारबांदोडा येथे झालेल्या एका मिनी बस अपघातात काल 10 प्रवासी जखमी झाले. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला कलंडली व खाली कोसळली. यावेळी अपघात स्थळावरील लोकांनी बसच्या खिडकीची तावदाने पुढचा आरसा तोडून प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांना इस्पितळात भरती करण्यात आले.