धारगळ येथे पुन्हा दरड कोसळली

0
10

महाखाजन-धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गालगतची दरड पुन्हा एकदा काल कोसळली. पंधरा दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा ही दरड कोसळल्यामुळे एमव्हीआर नामक कंत्राटदारने केलेल्या कामाच्या दर्जाची पोलखोल झाली. काल ही दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. अग्निशामक दलाने ही दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.