धारगळ महाखाजन येथे हर्षद सुनील ऐशी हा २१ वर्षीय युवक त्याची स्कूटर मागच्या बाजूने दुसर्या वाहनावर धडक ठार झाला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० रोजी सकाळी सात वाजता धारगळ येथील हर्षद सुनील ऐशी हा युवक आपल्या ऍक्टिवा जी ऐ ११ बी ६४४२ या वाहनाने जात असता पुढील एक अवजड वाहनावर मागच्या बाजूने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला , जखमी अवस्थेत त्याला गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेले. उपचार चालू असताना सायंकाळी ४ वाजता मरण पावला. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.