खंडणीच्या आरोपाखाली अटक केलेल्या कॉंग्रेस नेते धर्मेश सगलानी यांना काल पणजीच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी सशर्त जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हरयाणास्थित व सध्या पर्वरीत राहणार्या अंकित जजोडिया यांनी धर्मेश सगलानींविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा अन्वषेण विभागाने सोमवारी चौकशीअंती अटक केली होती.