धर्मांतर बंदी कायद्याची सरकारची तयारी : नायडू

0
101

आग्रा येथील धर्मांतर प्रकरणी संसदेत सविस्तर चर्चा करण्याची तयारी काल सरकारने दर्शविली, इतकेच नव्हे तर सर्वपक्षीय पाठिंबा मिळणार असेल तर धर्मांतरांवर बंदी घालायला सरकार तयार आहे, असे संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल सांगितले. विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवल्यानंतर सरकारच्या वतीने नायडू यांनी तसे निवेदन केले. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आग्य्रातील धर्मांतरांसंबंधी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. तेव्हा नायडू यांनी हे स्पष्टीकरण दिले.