पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेसाठी द. आफ्रिकेने आपला १५ सदस्यीय संघ काल सोमवारी जाहीर केला. संघाचे नेतृत्व रेयनार्ड व्हॅन टोंडर याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मागील वेळी द. आफ्रिकेला १६ संघांमध्ये ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे चांगली कामगिरी करण्याचा दबाव त्यांच्यावर असेल. द. आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज मखाया एन्टिनी याचा मुलगा थांडो याचीदेखील संघात निवड करण्यात आली आहे.
द. आफ्रिका संघ ः रेयनार्ड व्हॅन टोंडर, मॅथ्यू ब्रीट्झ्के, जॉन ड्युप्लेसिस, जेसन निएमांड, जेराल्ड कोएट्झे, जेड डेन क्लर्क, फ्रेझर जोन्स, वांदिले माकवेटू, आंदिले मोगाकाने, गवदिसे मोलाफे, थांडो एन्टिनी, जीवेशन पिल्ले, हर्मन रोल्फस, कीनन स्मिथ व अखोना मायांका.