द्विपक्षीय कराराचा चीनकडून अनादर

0
281

>> राज्यसभेत राजनाथ सिंहांनी दिली माहिती

चीनकडून सीमारेषेबाबत द्विपक्षीय कराराचा अनादर केला जात आहे. चीन बोलतो तसे वागत नाही असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. लडाख सीमेवरील स्थिती संदर्भात राज्यसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी हा आरोप केला. मे महिन्यात लष्करी चर्चा सुरू असताना चीनने पश्चिम सेक्टरमध्ये अनेकदा नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केले मात्र आपल्या जवानांनी वेळीच नियंत्रण रेषेवर ठोस कारवाई करुन चीनचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. यावरून चीनच्या बोलण्यात आणि कृती करण्यात फरक दिसून येत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. सीमारेषेवर चीनकडून सैन्याची जमवाजमव सुरू असून ही कृती म्हणजे १९९३ आणि १९९६ च्या कराराचे उल्लंघन आहे. एलएसीचा आदर हा सीमा भागात शातंता आणि स्थिरता राखण्याचा आधार आहे असे राजनाथ सिंह म्हणाले.