दोन वर्षांत १५० टन प्लास्टिक कचरा गोळा

0
62
 पहिल्यांदाच अशा प्रकारे गोवाभरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्लॅस्टिक कचर्‍याची कायम राज्याबाहेर वाहतूक करणे शक्य नसल्याने आता प्लॅस्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असून डिचोली तालुक्यात तो उभारण्याची सगळी तयारी सरकारने केली असल्याचे ते म्हणाले. डिचोली नगरपालिकेच्या जागेत हा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून हा अमेरिकन तंत्रज्ञानावरील प्रकल्प असणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. प्लॅस्टिक कचर्‍यापासून पेट्रोल किंवा डिझेल तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभा झाला की राज्यातील सुमारे ६० ते ७० टक्के प्लॅस्टिक कचर्‍यावर प्रक्रिया होऊ शकेल, असे डिसोझा यानी स्पष्ट केले.

कर्नाटकी प्रक्रिया खर्चिक

या प्लॅस्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गोव्यात नसून त्यामुळे हा कचरा कर्नाटकात पाठवावा लागतो व ते अत्यंत खर्चिक ठरत असल्याचे ते म्हणाले. चार ते पाच टन प्लॅस्टिक कचरा कर्नाटकात पाठवण्यासाठी सुमारे २० ते २५ हजार रु. एवढा खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.