शिवोली येथील ईशकृपा सदन या वसतीगृहात राहणार्या दोघा अल्पवयीन मुलींचे अज्ञातानी अपहरण केल्याची तक्रार येथील सेंट जोसेफ चर्चच्या सिस्टर यांनी हणजुण पोलीस स्थानकात दिली आहे. ओरिसा येथील एक व काणकोण येथील एक (दोन्ही १६ वर्षीय) अशा मुलींचे शिवोली येथून अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार आहे. या तक्रारीनंतर हणजुण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश केरकर यांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.