दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

0
247

उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची काल बिनविरोध निवड झाली. उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी कार्तिक कुडणेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीक्षा कांदोळकर यांची निवड करण्यात आली. तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर यांची तर खुशाली वेळीप यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झालेल्या या उमेदवारांशिवाय अन्यकुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

वरील पदांवरील निवडणुकीसाठी ८ जानेवारी ही अधिकृत तारीख होती. त्यामुळे वरील दोन्ही अध्यक्ष व उपाध्यक्षकांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज ८ रोजी करण्यात येणार असल्याचे काल सूत्रांनी स्पष्ट केले.
हल्लीच झालेल्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत सत्ताधारी भाजपचा विजय झाला होता व विरोधी कॉंग्रेस, मगो व आम आदमी पक्ष यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे काल दोन्ही जिल्हा पंचायतींवर अध्यक्ष तसेच उपाध्यक्षकांची जी वर्णी लागली आहे ते भाजपशी संबंधित आहेत.