दोन्ही जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड

0
6

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असून, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी शंकर चोडणकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी संजना वेळीप यांची काल बिनविरोध निवड झाली.

शंकर चोडणकर हे मये येथून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून, तर संजना वेळीप या गिरदोली येथून जिल्हा पंचायत सदस्य आहेत. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींची काल सोमवारी बैठक झाली. या बैठकीत उत्तर आणि दक्षिण जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने, तसेच त्यांच्या नावाबाबत एकमत झाल्याने चोडणकर व वेळीप यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. चोडणकर व वेळीप यांचे कार्य लक्षात घेऊन भाजपने अध्यक्षपदासाठी त्यांची नावे निश्चित केली होती.