दोन्ही जिल्हा पंचायतींच्या नव्या अध्यक्षांची नावे निश्चित

0
6

भाजपने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी शंकर चोडणकर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी संजना वेळीप यांचे निश्चित केले असून, काल दोन्ही उमेदवारांनी आपापले अर्ज सादर केले.
काही दिवसांपूर्वी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी पदाचे राजीनामे दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त आहेत.

जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी भाजप समर्थक सदस्यांमध्ये चुरस लागली होती. अखेर, शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दोन्ही जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी निवडीबाबत घोषणा केली.
यानंतर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी शंकर चोडणकर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी संजना वेळीप यांनी आपले अर्ज काल सादर केले. जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षांची निवड येत्या 2 सप्टेंबर रोजी केली
जाणार आहे.