राज्यातील उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर यांचे राजीनामे पंचायत संचालक सिद्धी हर्ळणकर यांनी काल स्वीकारले. दरम्यान, दोन्ही जिल्हा पंचायतीच्या नूतन अध्यक्षांची निवड येत्या 26 ऑगस्ट रोजी केली जाणार आहे.
भाजपच्या प्रदेश समितीच्या आदेशानंतर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी गेल्या 2 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले होते. त्यांना आपली राजीनामापत्रे मागे घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत होती. या काळात दोघांनी राजीनामा पत्रे मागे न घेतली नाहीत. त्यामुळे पंचायत संचालक सिद्धी हर्ळणकर यांनी राजीनामे स्वीकारून नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.