दोन्ही जिल्हाधिकार्‍यांची राजकीय पक्षांना नोटीस

0
9

विविध ठिकाणी आपल्या पक्षाचे पोस्टर लावून आणि भिंती रंगवून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांचे पोस्टर लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर सरकारी यंत्रणेने त्याविरोधात कारवाईला प्रारंभ केला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि नागरिकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रकरणी राजकीय पक्षांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.