दोन्ही जागांवर भाजपचाच विजय होईल : तानावडे

0
8

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मतदानानंतर दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केला.
आम्ही देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असून, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याने देशातील अन्य भागांप्रमाणेच गोव्यातही भाजपचाच विजय होणार असल्याचे तानावडे म्हणाले.

विक्रमी मतदान केल्याबद्दल आपण गोव्यातील मतदारांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण गोव्यात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भव्य सभांचा पक्षाला मोठा फायदा झाला असून, त्यामुळे भाजपचा दोन्ही जागांवर विजय निश्चित असल्याचे तानावडे यांनी नमूद केले.