गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने काल दोनापावल येथील एका हॉटेलजवळ तिघा युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८.५० लाखांचा अमली पदार्थ हस्तगत केला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये मुंबईतील दोन आणि हैदराबाद येथील एका युवकाचा समावेश आहे. शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
या युवकांजवळील मर्सिडीज बेंझ आलिशान कारही जप्त करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या बेकायदा व्यवहारात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. गोवा पोलिसांकडून विविध भागांत कारवाई करून अमली पदार्थ हस्तगत केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी दोन विदेशी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून २०-२२ लाखांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.