दोनापावलमधील अपघातात १ ठार

0
126

दोनापावल येथे ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास फॉर्च्युनर आणि हिरो होंडा मोटर सायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल चालक शशिनारायण या युवकाचे निधन झाले. या प्रकरणी फॉच्युनरचा चालक पवन वळवईकर याच्या विरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक पोलिसांकडून राज्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून पहाटेपर्यंत ९७ मद्यपी वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. याच काळात वाहतूक नियमभंग प्रकरणी १४४८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग किंवा किनारी भागात नववर्षाच्या सुरुवातीला मोठ्या अपघाताची नोंद झालेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.