मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. वाजपेयी यांच्या निधनाने देश एका मुत्सद्दी, चतुर, स्पष्टवक्ता राजकारणी आणि कवीला मुकला आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचा पहिला पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयी यांना प्राप्त झाला. तीन वेळा पंतप्रधानपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी देशाला विकासाच्या नवीन शिखरावर नेऊन ठेवले. वाजपेयी यांच्या निधनामुळे देश दूरदर्शी आणि महान नेत्याला मुकला आहे, असे पर्रीकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा
माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पंतप्रधान कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी भरघोस योगदान दिले आहे, अशा शब्दात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.