भारतात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ५ हजारांहून कमी नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एकूण ४ हजार ४१७ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ३३६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५ लाख २८ हजार ३० झाली आहे. गेल्या २४ तासांत देशातील ६ हजार ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४ कोटी ३८ लाख ८६ हजार ४९६ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात १९ लाख ९३ हजार ६७० लसींचे डोस देण्यात आले.