भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, देशात गेल्या २४ तासात ३१५७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १९५०० वर पोहोचली आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण राजधानी नवी दिल्लीमध्ये आढळले आहेत. नवी दिल्लीत १४८५, हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशमध्ये २६८ आणि महाराष्ट्रात १६९ करोना रुग्ण आढळले आहेत. भारतातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८६ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. देशात २४ तासात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या २४ तासात २७२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.