देशात लोकशाही व संविधान यांना वगळले जात आहे

0
19

>> कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची टीका

आपली गंगा-जमुना संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. लोकशाही आणि संविधान देशातून बाजूला सारले जात आहे, अशा वेळी कॉंग्रेस गप्प बसू शकत नाही, असा इशारा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिला. कॉंग्रेसचा १३७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अभिवादन केले. राहुल गांधी यांनी ट्विट करताना, आपण कॉंग्रेसचे आहोत. कॉंग्रेस हा असा पक्ष आहे की ज्याने देशात लोकशाहीची स्थापना केली आणि आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.