देशात उष्णतेच्या लाटेची शक्यता

0
11

देशभरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशात येत्या 4 ते 5 दिवसात तापमानात झापाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष नको असा इशाराही देण्यात आला आहे. पुढचे काही दिवस देशभरातील तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.