देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित

0
155

>> केंद्रीय क्रीडा मंत्रालायचा निर्णय; सराव सत्रे चालू राहतील

‘कोविड-१९२ अर्थात ’करोना’ विषाणूच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रिय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ‘देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या असल्याची मातिही प्रासारमाध्यमाला दिली आहे.

स्पर्धा स्थगित झाल्या असल्या तरी खेळाडूंनी घाबरुन न जाता सरावावर लक्ष केंद्रित करावे. सक्तीची विश्रांती मिळाली असली तरी ती खेळाडूंच्या पथ्यावरच पडेल व आगामी स्पर्धांसाठी खेळाडू पूर्ण सज्ज होऊन मैदानात उतरतील. सध्याच्या क्षणी क्रीडापटूंच्या आरोग्यापेक्षा अन्य काहीही महत्त्वाचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
क्रीडामंत्री म्हणाले, ऑलिम्पिकविषयी या क्षणी कुणालाही प्रश्न उपस्थित करू नये, तीन महिन्यांच्या कालावधीत परिस्थिती काय असेल हे कोणालाही माहिती नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संबंधित सार्वभौम सरकारांच्या निर्देशानुसार आम्हाला उदयोन्मुख परिस्थितीला प्रतिसाद द्यावा लागेल.

काल भारत सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओए) आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) यांना नव्याने सूचना जारी केल्या. भारतीय खेळाडूंचे रक्षण करण्यासाठी अनुसरण करा, असे स्पष्ट सुनावले आहे.

भारत सरकारचे उपसचिव एसपीएस तोमर यांनी एका पत्राद्वारे येत्या १५ एप्रिलपर्यंत निवड चाचण्यांसह कोणतेही क्रीडा स्पर्धा आयोजित न करण्याची ताकिदच विविध देशातील सर्व प्रमुख क्रीडा आयोजकांना दिला आहे. क्रीडा मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय शिबिरे यापूर्वीच थांबविली आहेत. त्यामुळे आता टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या शिबिरांमध्ये सराव करीत असलेल्या कुठल्याही ऍथलिट्‌सला संपर्क होऊ नये याची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सदर पत्रात, सध्या प्रशिक्षण शिबिरात नसलेल्या कोणताही प्रशिक्षक, तांत्रिक, सहाय्यक कर्मचारी, ऍथलिटला संगरोध शिस्तीचे पालन केल्याशिवाय प्रशिक्षणार्थी ऍथलीट्सशी संवाद साधू किंवा मिसळण्याची परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) आपल्या नेमबाजांसाठी दिल्लीतील डॉ. करणीसिंग शूटिंग रेंज येथे ऑलिम्पिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे.