देशात कोरोनामुळे मरण पावणार्यांची संख्या काल सात हजारांच्या नजीक पोहचताना (६९२९) कालच्या दिवसभरात एकूण ९९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कालच्या २४ तासांत देशात एकूण २८७ कोरोना मृतांची नोंद झाली. यापैकी सर्वाधिक ५३ महाराष्ट्रातील, दिल्लीतील २९ व गुजरातमधील १९ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
गेल्या शनिवारी जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसणार्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पाचवा असल्याची नोंद झाली. स्पेनला पिछाडीवर टाकत भारत या स्थानावर पोचला. यामुळे आता भारतापुढे अमेरिका, ब्राझील, रशिया व ब्रिटन हे चारच देश या क्रमवारीत पुढे आहेत.
भारतात सध्याच्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ४०६ एवढी आहे. तर आतापर्यंत १ लाख १९ हजार २९२ रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. बरे होणार्या कोरोना रुग्णांची टक्केवारी ४८.३६ एवढी असल्याचे सांगण्यात आले.