देशाच्या भविष्यासाठी भाजपला विजयी करा

0
5

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवण्यासाठीची असून, मतदारांनी विकासपुरुष अशी प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींच्या विजयासाठी भाजपच्या गोव्यातील दोन्ही उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केले.

नरेंद्र मोदींनी ‘विकसित भारत : 2047’चे स्वप्न पाहिले असून, ते पूर्ण करण्यासाठी केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत काय काय करायचे त्याची योजना मोदींनी तयार केली असून, त्यांनी आतापर्यंत जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आम्ही प्रचारानिमित्त संपूर्ण गोवा पिंजून काढला असून, तीन टप्प्यांत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. चाळीसही मतदारसंघात आम्ही प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही सभा झाल्या. काँग्रेसचे बडे नेते प्रचारासाठी गोव्यात आलेच नाहीत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच हार मानल्याचे तानावडे म्हणाले.
भाजपने बहुजन समाजासाठी काहीही केलेले नाही हा काँग्रेसने केलेला आरोप यावेळी श्रीपाद नाईक यांनी खोडून काढला. पूर्वी ओबीसींना 19 टक्के एवढेच आरक्षण मिळायचे. भाजपनेच ते वाढवून 27 टक्के एवढे केल्याचे नाईक म्हणाले.