केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेताना येत्या १८ ऑक्टोबरपासून अर्थात सोमवारपासून देशातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना पूर्ण १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. या वर्षी जुलै महिन्यात बर्याच कालावधीनंतर प्रवासी विमानवाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती. ९ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्व विमान कंपन्यांनी मिळून एकूण २ हजार ३४० आंतरदेशीय विमानांचे उड्डाण केले.