दोन वर्षांमध्ये देशभरात ‘५जी’चे जाळे उभारण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दिल्लीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ५जी सेवा लॉंच करण्याची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतात लवकरच ५जी सेवेला सुरुवात होणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये संपूर्ण भारतामध्ये ५जी सेवा सुरु करण्याचं केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्याशिवाय ऑक्टोबरमध्ये देशात ५जी सेवेला सुरुवात होणार असल्याचेही संकेत यावेळी त्यांनी दिले. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी लिलावाची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने ५ जी सेवांसाठी रोलआऊटच्या तयारी करण्यास सांगितले. ५ जी सेवा सुरु करण्याचा अखेरच्या टप्प्यामध्ये भारत पोहोचला आहे. लवकरच भारतात ५जी सेवा सुरू होणार आहे.