देशभरात चोवीस तासांत कोरोनाचे 656 नवे रुग्ण

0
19

>> केरळमध्ये आणखी एकाचा मृत्यू, चार दिवसांत एकूण 7 दगावले

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे नवे 656 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 742 वर पोहोचली आहे. 24 तासांत 333 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. केरळमध्ये 296 लोक बरे झाले आहेत.
केरळमध्ये काल रविवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या 4 दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत येथे 425 नवीन रुग्ण आढळले आहेत.

केरळनंतर कर्नाटकात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. 24 तासांत येथे 104 नवीन रुग्ण आढळले असून 8 लोक बरे झाले आहेत. कर्नाटकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 271 वर पोहोचली आहे.

एक महिन्यात जगभरात
जेएन.1 41 देशांत

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा नवीन जेएन.1 प्रकार आतापर्यंत 41 देशांमध्ये पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा आणि स्वीडनमध्ये जेएन.1 ची प्रकरणे सर्वाधिक आहेत. 22 डिसेंबरपर्यंत भारतात नवीन प्रकाराची 23 प्रकरणे आढळून आली आहेत.

सध्या देशातील परिस्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण कोविड-19 संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,50,07,212 इतकी आहे. यापैकी सध्या 2,997 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केरळमध्ये संसर्गामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,33,328 वर पोहोचली आहे. इतर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,44,70,887 झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले
आहेत.

केंद्राच्या सूचना

केंद्र सरकारने सर्व राज्यांना नवीन प्रकाराबाबत एक सल्ला जारी करताना सर्व राज्यांना जास्तीत जास्त कोविड चाचण्या घेण्यास सांगण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. निर्बंध लादून जास्त घाबरण्याची किंवा सीमेवर (केरळ, तामिळनाडू राज्ये) पाळत वाढवण्याची गरज नाही. तसेच, केरळ आणि तामिळनाडूला लागून असलेल्या सर्व सीमावर्ती जिल्ह्यांनी सतर्क राहावे. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करताना लोकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.