देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,834 रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 18,389 झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 5.30 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तर संक्रमित लोकांची आकडेवारी 4.47 कोटींच्या पार गेली आहे. आतापर्यंत देशातील 4.41 कोटी लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आरोग्य मंत्रालयाने देशभरात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.