देशभरातील पोटनिवडणुकांचा संमिश्र निकाल

0
11

गुजरात आणि हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबत देशात पाच ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक आणि एक लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील एक आणि बिहारमधील एका जागेवर विजय मिळवला. कॉंग्रेसने छत्तीसगड व राजस्थानमधील प्रत्येकी एक जागा जिंकली. उत्तर प्रदेशातील एका जागेवरील लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला.