गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात ५८ हजार ९७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून चोवीस तासांत केवळ १५ हजार ३८९ जण बरे झाले आहेत.
त्यामुळे आता देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. या दरम्यान ५३४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात २ लाख १४ हजार ४ कोरोना रुग्ण आहेत. दैनंदिन संसर्ग दर वाढत आहे आणि आज ४.१८ टक्के आहे.