गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम असून गेल्या २४ तासांत ४४ हजार ६५८ नवे रुग्ण आढळले. तसेच ४९६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ३ हजार १८८ झाली आहे.
त्यापैकी ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर एकूण ४ लाख ३६ हजार ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३२ हजार ९८८ रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६० टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. दरम्यान, केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत ३० हजार ७ रुग्ण एकट्या केरळ राज्यातील असून १६२ मृत्यू हे केरळमध्ये झाले आहेत.