>> बिहारात लागू करणार नाही
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी देशपातळीवर एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स) अनावश्यक असल्याचे काल स्पष्ट प्रतिपादन केले. एनआरसी लागू करण्याला काही औचित्यच नसल्याचा दावा त्यांनी केला. ही बाब त्यांनी विधानसभेच्या पटलावर स्पष्ट केली. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेत त्याआधी आपल्या भाषणावेळी मागणी केली होती की मुख्यमंत्री कुमार हे केंद्र व राज्य सरकारातील घटक पक्षाचे नेते असल्याने त्यांनी सीएए, एनआरसी व एनपीआय या विषयांवर भूमिका स्पष्ट करावी.
नितीश कुमार यांनी आपल्या मतप्रदर्शनावेळी ही एनआरसीची चर्चा कोठून आली असा सवाल केला. सीएए, एनआरसी व एनपीआर या विषयांवरून देशात प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एनआरसीची प्रक्रिया ही आसामपुरतीच होती. तत्कालीन राजीव गांधी सरकारने त्याविषयी करार केला होता असे ते म्हणाले.