देशपातळीवर आतापर्यंत ४५ ओमिक्रॉन रुग्ण

0
12

देशाची राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या चार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत आतापर्यंत एकूण सहा रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक रुग्ण बरा झाला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४५ रुग्ण आढळले आहेत. सध्या ८ राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडचा समावेश आहे. महाराष्ट्र २०, राजस्थानात ९, दिल्ली ६, कर्नाटक ३, गुजरात ४, केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगड प्रत्येकी १ रुग्ण सध्या आहेत.