देवेंद्र फडणवीस गोव्यात

0
22

भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर काल आगमन झाले.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो या भाजपच्या प्रमुख मंत्र्यांशी वैयक्तिक पातळीवर राजकीय घडामोडी, त्यांचे निवडणुकीसाठी नियोजन या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी या मंत्र्यांचे मत जाणून घेतले. उत्पल पर्रीकर यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उत्पल यांनी भेट घेतली.

डिलैला लोबोंना शिवोलीतून
उमेदवारी ः मायकल

गोवा विधानसभेच्या आगामी २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत माझी पत्नी डिलैेला लोबो शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. डिलैला लोबो ह्या अपक्ष किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून निश्‍चितच निवडणूक लढवतील. असेही त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.