देवस्थान नियमन दुरुस्ती विधेयक पुढील अधिवेशनात

0
14

महाजनांमधील वादाचा देवस्थानच्या उत्सव आयोजनावर परिणाम होऊ नये, म्हणून देवस्थान नियमनामध्ये पुढील अधिवेशनात आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानसभेत दिली. उत्तर गोव्यातील श्री माया केळबाय पंचायतन देवस्थान मये-डिचोली, श्री रवळनाथ देवस्थान वेळूस आणि श्री आजोबा देवस्थान सत्तरी या तीन देवस्थानांमधील महाजनांमध्ये वाद सुरू आहे. परिणामी त्या देवस्थानांमधील उत्सव आयोजनामध्ये अडथळे येतात. देवस्थानचे प्रशासक असलेल्या अधिकाऱ्यांकडून उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे; मात्र महाजनांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. त्यामुळे उत्सवांच्या आयोजनामध्ये अडचणी येतात, असे मोन्सेरात यांनी सांगितले.