दुहेरी नागरिकत्वाचा विषय केंद्रापुढे मांडला : मुख्यमंत्री

0
12

दुहेरी नागरिकत्व, त्याचप्रमाणे पारपत्र, ओसीआय कार्ड आदी भारत सरकारकडे सुपूर्द करणे आदी मुद्दे गोवा सरकारने केंद्र सरकारपुढे मांडले आहेत, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे त्यांनी जागतिक गोमंतकीय संघटनेच्या स्थापनेनिमित्त काल बोलताना स्पष्ट केले. पुढील वर्षी राज्यात जागतिक गोमंतकीय संमेलन आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान, या प्रकरणामुळे लोकांची व विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची खूप अडचण होत आहे, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि या मुद्द्याकडे मानवतावादी नजरेने पहावे, असे आवाहन केले.