दुर्लक्षित मिठागरांच्या विकासाचे आश्‍वासन

0
256

दुर्लक्षित झालेल्या राज्यातील मिठागरांच्या विकासासाठी व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आश्‍वासन उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी काल विधानसभेत आमदार विष्णू सुर्या वाघ यांच्या प्रश्‍नावर दिले.
मिठागारांसाठी विजेच्या जोडणीची गरज असते, अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाघ यांनी केली. मिठागारासाठी असलेल्या योजना योग्य पध्दतीने राबविण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्‍वासनही मंत्र्यानी दिले.