दुचाकीखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू

0
4

नववर्षानिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या तामिळनाडूतील एका दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वास्कोतील एका पेट्रोल पंपावर इंधन भरत असताना खान नामक दांपत्याच्या 2 वर्षे 10 महिने वयाच्या मुलीवर दुचाकी पडल्याने तिचा मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली.
वास्को पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्ष व पर्यटनासाठी कलिलुल्ला खान हे पत्नी व मुलीसह गोव्यात आले होते. गोव्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी भाड्याने दुचाकी घेतली होती. त्या दुचाकीत पेट्रोल पंपावर इंधन भरत असताना वडिलांनी दुचाकीचा स्टँड लावला नव्हता, ज्यामुळे त्यांचा अचानक तोल गेला. वडील आणि आईसह दुचाकी लहान मुलीच्या अंगावर आदळली. त्यात आफिया खान ह्या चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. आफियाला चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.