दीपाश्री सावंत गावसला 2 दिवस पोलीस कोठडी

0
12

सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केलेल्या दीपाश्री सावंत गावा हिला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला. दीपाश्री सावंत हिच्या मालकीच्या 3 कार व 2 दुचाकी फोंडा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
याशिवाय सरकारी नोकरीसाठी 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सागर नाईकला सोमवारी पुन्हा अटक केली होती. त्याला न्यायालयाने एका दिवसाची कोठडी दिली आहे.

सरकारी नोकरी देण्यासाठी लाखो रुपये घेऊन फसवणूक केलेल्या दीपाश्री सावंत हिला सोमवारी फोंडा पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता तिला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दीपाश्रीच्या कार व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, अन्य मालमत्तेचा तपास फोंडा पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, म्हार्दोळ पोलिसांनी श्रीधर सतरकर याच्या आत्महत्येप्रकरणी पूजा नाईक हिच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सरकारी नोकरी देण्यासाठी लाखो रुपये घेऊन फसवणूक केलेली पूजा नाईक ही सध्या डिचोली पोलिसांच्या कोठडीत आहे.