दीपराज कोळमकरने जिंकली मिनी मॅरेथॉन शर्यत

0
99

साखळी (न. वा.)
साखळीतील ईगल स्पोर्ट्स क्लब आयोजित मिनी मॅरेथॉन शर्यतीचे प्रथम बक्षीस कुडणे येथील महालक्ष्मी हायस्कूलचा विद्यार्थी दीपराज कोळमकर याने प्राप्त केले. त्याला बक्षीसाच्या स्वरुपात रोख रु. ३००० व चषक प्राप्त झाला. साखळी मार्केट ते पर्ये सत्तरी येथील श्री भूमिका मंदिरापर्यंतच्या अंतराच्या या स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दीपराज कोळमकर यांच्या बरोबरच महालक्ष्मी हायस्कूलच्या, गौरेश मळीक, प्रथमेश सुतार, प्रितेश फाळकर, साईश मळीक, ओंकार सुतार, गौरंग मळीक, अत्रेय जल्मी, स्वयंम मळीक, मोहीत मळीक, सुरज देसाई या विध्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. त्यात सुरज देसाई याला प्रथम उत्तेजनार्थ तर गौरेश मळीक यांना तृतीय उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. स्लो साईकल स्पर्धेत मोहीत मळीक याने तृतीय स्थान प्राप्त केले.